जिल्ह्यात पुन्हा २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ; नव्याने २५ जणांना कोरोनाची लागण ;
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 19 :
जिल्ह्यात बुधवारी नव्याने 25 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली तर दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. सद्यस्थितीत जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालायाच्या आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 593 पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ तालुक्यातील सावळा येथील 52 वर्षीय पुरुष आणि नेर येथील 90 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 25 जणांमध्ये 19 पुरुष आणि 6 महिला आहेत. यात आर्णी शहरातील वार्ड नंबर 1 मधील एक पुरूष, तालुक्यातील अमराजपुर येथील एक पुरुष, यवतमाळ तालुक्यातील पिंपरी येथील एक महिला, सुकळी येथील एक महिला, यवतमाळ शहराच्या वैद्य नगरातील एक पुरूष, पुसद शहरातील न्यू पुसद मधील एक पुरूष, मोती नगर येथील दोन पुरूष व एक महिला, पार्वती नगर येथील एक पुरूष, द्वारका नगरी श्रीरामपुर येथील एक पुरूष व दोन महिला, आंबेडकर नगर येथील एक पुरूष, पुसद शहराच्या इतर भागातील तीन पुरूष व एक महिला, दारव्हा शहरातील दोन पुरूष, वणी शहरातील तीन पुरूष, पांढरकवडा शहरातील एक पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरूष यांचा समावेष आहे.
जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 593 असून होम आयसोलेशनमध्ये 139 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2367 झाली आहे. यापैकी 1573 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 62 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 155 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 101 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 38120 नमुने पाठविले असून यापैकी 37494 प्राप्त तर 626 अप्राप्त आहेत. तसेच 35127 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..