अतिउत्साह आला अंगलट ; पैनगंगेच्या पुरात तरूण गेला वाहून ; शोधमोहीम सुरू
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
पोहण्यासाठी गेलेला तरुण पैनगंगा नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना आज दुपारी एक वाजता च्या सुमारास धनोडा येथे घडली. शंकर वसंत अन्ने (३१) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. पैनगंगेचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. शंकर आळणे याने पुलाच्या ६ व्या कमानी वरून नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उडी घेतली. प्रवाहाच्या बाहेर निघून तीन ते चार वेळा त्याने उड्या घेतल्या मात्र शेवटी तीव्र प्रवाहात गटांगळ्या खात तो वाहून गेला. सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही तो आढळून आला नाही. नातेवाइकांनी सायंकाळी या घटनेची पोलिसांकडे तक्रार नोंदविल्या नंतर महागाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार बालाजी शेंगेपल्लू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..