उत्कृष्ट बैलजोडी पुरस्कार दिला घरपोच ; स्व.जयवंतराव गावंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची सात वर्षांपासूनची परंपरा कायम
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
कोरोना महामारीच्या काळात सुद्धा शासनाच्या नियमांचे पालन करून सांस्कृतिक परंपरा कायम ठेवून उत्कृष्ट बैलजोडी पुरस्कार उटी येथे संपन्न ,बळीराजाच्या घरी जाऊन दिला पुरस्कार मुक्या प्राण्यांच्याही संवेदना जपल्या जातात ,सात वर्षांपासून उत्कृष्ट बैलजोडी पुरस्काराचे यशस्वी आयोजन करण्यात येते.
भारत हा कृषीप्रधान देश आहे,त्यामुळे “शेतकरी जगला तर देश सुखी व समृद्ध होईल” या उदात्त भावनेतून शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने दरवर्षी पोळा या सणी स्व. जयवंतराव गावंडे बहुद्देशीय सेवाभावी संस्था उटी यांच्या सौजन्याने उत्कृष्ट बैलजोडी पुरस्काराचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत गावंडे करतात.
बळीराजासोबत एकनिष्ठ असलेला सर्जा -राजा एका कडब्याच्या पेंढीवर दिवसभर तिफण ओढतो, कष्ट करून बळीराजाला समृद्ध व सदन करतो.या हेतूने मुक्या प्राण्याचा व त्याची निगा करणाऱ्या बळीराजाचा सन्मान व सत्कार शाल, टोपी, श्रीफळ,सन्मानपत्र, सन्मानचिन्ह फुलगुच्छ देऊन श्री गजानन महाराज संस्थान उटी या पटांगणात करण्यात येतो परंतु सध्या जगात कोरोना या महारोगाने ग्रासले आहे त्याला आळा घालण्यासाठी शासनाने दिलेले नियम व अटींचे पालन करून हा पुरस्कार शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दीला आहे.
यावर्षी उत्कृष्ट बैलजोडी म्हणून प्रथम क्रमांक येण्याचा मान गजानन पुंजाजी वानखेडे यांच्या बैलजोडीने पटकाविला.दुसरा क्रमांक येण्याचा मान साहेबराव भिमराव वानखेडे यांच्या बैलजोडीने पटकावला तर तृतीय क्रमांक हा विष्णू अंबादास धोत्रे या बैलजोडीने फटकावला. उटीतील ज्येष्ठ नागरिक बापूराव वानखेडे उटी गावचे सुपुत्र पुसद येथील औषधी व्यावसायिक श्रीकांत निळकंठराव गावंडे ,विलास वानखेडे , ,गणेश वानखेडे, यांच्या हस्ते उत्कृष्ट बैलजोडी व बळीराजाचा सत्कार करण्यात आला.
उत्कृष्ट बैलजोडी निवड समिती म्हणून बापुराव दत्तराव वानखेडे सुनिल उद्धवराव गावंडे सीताराम पडोळकर विलास गोविंदराव वानखेडे गणेश बाबाराव वानखेडे दत्ता रमेश वानखेडे रामराव पुंजाजी वानखेडे अवधूत वानखेडे यांनी उत्कृष्टरित्या काम पाहिले.यावेळी कोरोणामुळे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून मोजकेच गावकरी मंडळी हजर होते ,सूत्रसंचालन प्रल्हाद राठोड सर यांनी केले तर आभारप्रदर्शन श्रीकांत निळकंठ गावंडे यांनी केले.