धरती आबा अभियानांतर्गत खैरखेडा येथे विशेष शिबिराचे आयोजन ; राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 23 :- पीएम जनमन या योजनेच्या धर्तीवर इतर अनुसूचित जमातीच्या नागरीकांना लाभ देण्यासाठी धरती आधा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पुसद तालुक्यातील खैरखेडा येथे विशेष जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्याहस्ते झाले.
धरती आबा योजनेमध्ये 25 प्राधान्यक्षेत्रे व 17 मंत्रालये निश्चित करण्यात आलेली आहेत. या योजनेचे प्रभावी अमंलबजावणी करीता पुसद प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील एकूण 147 गांवे मंजूर यादीत समाविष्ठ करण्यात आलेली आहे. त्यात पुसद तालुक्यातील 101 गावे, उमरखेड 16, महागाव 10, दिग्रस 08, दारव्हा 3. नेर 1 व आर्णी तालुक्यात 8 गांवे असे एकुण 147 गावांचा समाविष्ठ असून प्रकल्पांतर्गत एकुण 64 ठिकाणी जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
पुसद तालुक्यातील मौजे खैरखेडा येथे शिबीराचे उदघाटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे हस्ते करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी पुसदचे तहसिलदार एम.एम. जोरवार, प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेकरीता गटविकास अधिकारी अमोले आंडेलवाड, कृषी अधिकारी आरोग्य अधिकारी तसेच क्लस्टर मधील लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरीक तसेच खैरखेडा गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, मंडळ अधिकारी. कृषी सहायक, नोडल अधिकारी व इतर संबधीत विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
खैरखेडा येथील शिबीरामध्ये अंदाजे 620 नागरीकांनी सहभाग घेतलेला आहे. सहभागी नागरीकांना विविध प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आलेले आहे. तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याहस्ते शासकीय आश्रमशाळा खैरखेडा येथील सांस्कृतीक सभागृहाचे उद्घाटन करुन शाळेला हस्तांतरण करण्यात आले. अनुसुचित जमातीच्या मुलींना जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात येऊन शिक्षण घ्यावे तसेच धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान योजनेतून जास्तीत जास्त विकास कामे करण्यात येतील असे सांगितलेले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..