नागरी, ग्रामीण सहकारी पतसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 23 :- आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी, ग्रामीण सहकारी पतसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता सहकार भवन येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील पतसंस्थांमधील एकुण २४८ प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणास राज्य समन्वयक धनंजय डोईफोडे, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, सहाय्यक निबंधक अर्चना माळवे, सहाय्यक निबंधक रिता निनावे, कार्यालय अधिक्षक गणेश राठोड तसेच तालुक्यातील सर्व सहाय्यक निबंधक उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये सायबर सिक्युरीटी लेटेस्ट फ्रॉड्स, डिजीटल अरेस्ट, स्कॅम, क्रिप्टोकरन्सी, अँटी मनी लॉन्ड्रिंग तरतुद या विषयावर प्रकाश तायडे, थकीत कर्ज वसुली प्रक्रियेसाठी घ्यावयाची दक्षता व कायदेशीर तरतुद या विषयावर सेवानिवृत्त प्राचार्य कवडु नगराळे तसेच पतसंस्थांसाठीचे सुधारीत आर्थिक मापदंड, पतसंस्था ठेवी संकलन व गुंतवणुक व्यवस्थापन ग्राहक संबंध, आव्हाने व व्यवसायाच्या नवनवीन संधी याबाबत अॅड. राहुल शेंद्रे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य समन्वयक धनंजय डोईफोडे यांनी केले. संचलन अजित डेहणकर यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रश्नोत्तरे, शंका समाधान तसेच प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. शेवटी मनोज भगत यांनी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..