थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया सुरू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 23 :- द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी २० जुन ते २ जुलै असा कालावधी सुरु आहे. बारावीची परीक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या, तसेच आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.
या कालावधीत विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी तंत्रशिक्षण मंडळाच्या https://dsd२५users.dtemaharashtra.gov.in/dsd२५/ संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवडून ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज निश्चित करू शकतात. विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरतांना बऱ्याचदा चुका होतात. त्यादृष्टीने सुविधा केंद्रामध्ये मोफत ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवर्गाची कागदपत्रे, फोटो घेऊन सुविधा केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ए.पी. मटाले यांनी केले आहे. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी समन्वयक व्ही. एस. येंडे ९५०३७४६४९६ यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..