मनसेचं ‘वैभव’ मातोश्रीवर; राज ठाकरेंचे शिलेदार भडकले; उद्धव ठाकरेंची फसवणूक म्हणत तुटून पडले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या युतीची चर्चा जोरात असताना मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेच्या पदाधिकाऱ्याचा पक्षप्रवेश झाला आहे. अंधेरी पूर्वमधील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाकरेसेनेत प्रवेश केला.
उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं. ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत गेलेल्या सुजाता शिंगाडे यांची घरवापसीदेखील याचवेळी झाली. उद्धव ठाकरेंनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
गेल्या दीड महिन्यांपासून शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या युतीची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी एक पत्रकार परिषद घेत मनसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करण्याबद्दल सकारात्मक असल्याचं म्हटलं. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये मातोश्रीवर मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला.
वैभव दळवी मनसेचे अंधेरी पूर्वेतील पदाधिकारी होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची त्यांची इच्छा होती. आज त्यांनी समर्थकांसह हाती शिवबंधन बांधून घेतलं. यावेळी ठाकरेंचे विश्वासू शिलेदार आणि विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांच्यासह अन्य प्रमुख नेते हजर होते. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता पाहता उद्धव यांनी पक्ष बांधणीकडे विशेष लक्ष दिलं आहे. दळवी यांच्या पक्षप्रवेशाकडे त्याचाच भाग म्हणून पाहिलं जात आहे.
वैभव दळवींच्या शिवसेना प्रवेशावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘वैभव दळवी आमचा पदाधिकारी नाही. उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी त्यांना फसवतात. उद्धव ठाकरेंनी माहिती घ्यावी, क्रॉस चेक करुन पाहावं. वैभव दळवी २०१४ मध्ये आमच्याकडे होता. तेव्हा त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हापासून ना तो आमच्या बॅनरवर आहे, मा त्याच्याकडे आमच्याकडून देण्यात आलेलं नियुक्तीपत्र आहे,’ असं देशपांडे म्हणाले.
‘वैभव दळवी आमच्या पक्षात नाही. तो मनसेचा पदाधिकारी नाही. तो बदनाम व्यक्ती आहे. त्याच्यावर कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तो आमच्या पक्षाचा नाही. उद्धव ठाकरेंनी फॅक्ट चेक करुन पाहावं,’ असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..