शिंदे गटात गेल्याचा पश्चात्ताप, रात्रभर झोप लागली नाही; ठाकरे गटात आलेल्या महिला शिवसैनिकाने मांडली व्यथा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “एकीकडे मनसे- शिवसेना ठाकरे गट युतीच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे ठाकरे गटात आज अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. अंधेरी पूर्वमधील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जात शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
त्यासोबतच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनीही ठाकरे गटात घरवापसी केली. शिवसेना शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.
सुजाता शिंगाडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शिंदे गटावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी हात जोडत व्यथा मांडली. मला चार महिने झोप लागली नाही. केवळ तिकडे देखावा आहे. मला जी जबाबदारी द्याल ती पार पाडेन, असे सुजाता शिंगाडे म्हणाल्या.
तिकडे केवळ देखावा
“शिंदे गटात जाणं ही माझी मोठी चूक होती. खरी शिवसेना मातोश्रीतच आहे. मला कोणतंही अमिष नाही. म्हणून मी त्यांची मिंधी नाही. चार पाच महिने मी त्यांच्या पक्षात होते. मला अनेक महत्त्वाची पदं मातोश्रीने दिले. मी ३५ वर्ष मी संघटनेचं काम केलं आहे. शिंदे गटात कोणत्या अमिषाला बळी पडून लोक जातात हे सांगता येत नाही. मला चार महिने झोप लागली नाही. केवळ तिकडे देखावा आहे. कधी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना कधी भेटू असं झालं होतं”, असे सुजाता शिंगाडेंनी म्हटले.
अंधाधुंदी कारभार सुरू
“ज्या लोकांना पैसे घेऊन घेतलं. ते लोकही पश्चात्ताप होत आहे. मला शिंदे गटाने काही बैठका घ्यायला लावल्या होत्या. मी बैठका घेतल्या. पण तिथे कुणाचा कुणाला ताळमेळ नव्हता. अंधाधुंदी कारभार सुरू आहे. पैसे देऊन लोकांना घेतलं होतं. शिंदे कुणाकडे बघत नाही. मला मधल्या एजंटने फसवलं. मी माहेरी आले. माझ्या घरी आले. बरं वाटतं. मी ३५ वर्ष संघटनेचं प्रामाणिक काम केलं. मला खूप आनंद झाला”, असेही त्या म्हणाल्या.
उद्धव ठाकरेंसारखा माणूस नाही
“माझ्या विभागात हेवेदावे होते. म्हणून मी गेले होते. पण मी आज दिलगीरी व्यक्त करते. मला जाण्यात स्वारस्य नव्हतं. पदातही इंटरेस्ट नव्हता. लोकांनी जाऊ नये ही विनंती करते. जे गेले त्यांनी परत यावं. हे आपलं घर आहे. वहिनी माझ्यासोबत बोलल्या. बरं वाटलं. माँसाहेबांची जागा वहिनी चालवत आहे. उद्धव ठाकरेंसारखा माणूस नाही. नगरसेवक निघून जात आहेत. तरीही साहेब ठाम आहे. धनुष्य बाण मिळो ना मिळो आपली शिवसेना आपण मोठी करू. मला जी जबाबदारी द्याल ती पार पाडेल”, असेही सुजाता शिंगाडे म्हणाल्या.

बच्चू कडू हे गुवाहाटीला केवळ पैशासाठीच गेले. भाजपच्या जवळच्या व्यक्तीनेच केली शिंदेंच्या बंडाची पोलखोल…..
ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….