अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 16 :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्यावतीने महाराष्ट्र उद्योजक व्यापार व गुंतवणूक, सुलभता कक्षाच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष प्रोत्साहन योजनेंतर्गत अनुसूचित जमातीतील सुशिक्षित बेरोजगार महिला व पुरुषांकरिता निःशल्क दुग्ध तंत्रज्ञान व दुग्ध प्रक्रिया या तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुड, पुसद येथे होणार आहे. या कार्यक्रमात दुग्ध तंत्रज्ञान व दुग्ध प्रक्रिया तांत्रिक प्रात्यक्षिक व थेअरी सोबत उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग संधी, उद्योग उभारणीची प्रक्रिया, बाजारपेठ सर्वेक्षण प्रकल्प अहवाल, उद्योगांना लागणाऱ्या विविध नोंदणी व परवाने, शासकीय योजना, स्टँडअप योजना, उद्योग व्यवस्थापन, नेटवर्किंग, विक्री कौशल्य व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, उद्योगाची नोंदणी व विविध परवाने, वित्तसहाय्य व व्यवस्थापन, यशस्वी उद्योजकाचे अनुभव, उद्योगांना भेटी, अभिप्रेरणा प्रशिक्षण कर्जासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया व कर्ज परतफेडीचे महत्व इत्यादी मार्गदर्शन तज्ञांद्वारे करण्यात येणार आहे.
कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता दि. 21 एप्रिल रोजी उद्योजकता परिचय कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे. वयोगट १८ ते ४५ असून जातीचा दाखला, आधार कार्ड, टीसी, मार्कशीट, पॅनकार्ड व २ पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, ३ रा माळा, दारव्हा रोड यवतमाळ येथे व ८२७५०९३२३० यावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..