“फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यातून तुफान दगडफेक झाली. वाहनं फोडण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. जाळपोळ झाली. अनियंत्रित जमावाला आवरताना पोलीस, अग्निशमन दलाचे जवानही या हिंसाचारात जखमी झाले.
या हिंसाचारामुळे नागपूरच्या अनेक भागात अजूनही संचारबंदी कायम आहे. नागपूरमधील या राडा प्रकरणात फहीम खान हे नाव समोर आलय. फहीम खान या सगळ्या हिंसाचारामागचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. या फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
फहीम खानसह 50 आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. नागपूर सायबर पोलिसांनी मध्यरात्री हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. या हिंसाचाराच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बांग्लादेशातील दहशतवादी संघटनेचा या नागपूर राडा प्रकरणात सहभाग असल्याच समोर आलय.
किती व्हिडिओ पोलिसांना सापडले?
नागपूर हिंसाचाराला कारणीभूत ठरलेले व्हिडिओ इतर देशातील आहेत. सायबर पोलिसांना तपासात हिंसाचार भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडले आहेत. बांग्लादेश आणि इतर देशातील IP अड्रेसवरुन हे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. 172 व्हिडिओंचा IP अड्रेस आणि मोबाइल नंबरचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
काय आहे मालेगाव कनेक्शन?
नागपूरच्या दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानच मालेगाव कनेक्शन समोर आलं आहे. फहीम खान पाच महिन्यांपूर्वी मालेगावात येऊन गेल्याच समोर आलय. फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विधानसभा निवडणूक वेळी त्याने त्याच्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पक्षाची बांधणी केली होती. MDP पार्टी काढून मालेगाव मध्य मधून मोहम्मद फरान शकील अहमद यांनी निवडणूक लढवली होती.
कोण आहे फहीम खान?
फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. इयत्ता दहावीपर्यंत फहीम खान याचं शिक्षण झालय. सध्या तो 38 वर्षांचा आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष असलेल्या फहीम खान याने लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याला 1 हजार 73 मतं मिळाली होती. फहीम खानने नागपुरात जमाव जमवल्याचा आरोप केला जात आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….