‘औरंगजेबाची कबर, पुढची अयोध्या होणार’; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “खुल्ताबादमधील औरंगजेबाची कबरीवरुन राज्यात वाद पेटलाय. एवढंच नाही तर या वादावरून थेट मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये दंगल उसळलीय. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य करत औरंगजेबाची कबर पुढची अयोध्या होण्याचा खळबळजनक दावा केलाय.
राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याचं संरक्षण असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरु लागली. त्यातच विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी कारसेवेचा इशारा दिला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही औरंगजेबाची कबर हटवण्याची भूमिका घेतलीय.
राहत इंदोरींच्या शायरीचा आधार घेत नागपूर में तनाव है क्या, कुछ पता तो करो, सर पर चुनाव है क्या? असं म्हटलं जातंय. मात्र कुठलीही निवडणूक नसताना औरंगजेबावरुन वातावरण तापवण्यामागे पुढच्या लोकसभा निवडणुकीचं गणित असल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय. त्यामुळे निवडणूका जिंकण्यासाठी लोकांचे संसार उध्वस्त केले जात आहेत का? याबरोबरच औरंगजेबाच्या कबरीचा वाद दुसरी आयोध्या होण्याइतका तापणार का? याकडे लक्ष लागलंय.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….