नागपूर दंगलीचे बांगलादेश कनेक्शन, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये दोन गटामध्ये हिंसाचार उफळला होता. याप्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आलाय. नागपूर हिंसाचाराच्या तपासात पोलिसांना बांगलादेश कनेक्शन मिळाले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. नागपूर हिंसाचार आणि त्याआधी सोशल मीडियावर काय काय झालं? याचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता, त्यावेळी त्यांना बांगलादेशातून झालेली एक पोस्ट मिळाली आहे.
“अभी तो सिर्फ अटॅक हुआ है” अशा आशयाची एक पोस्ट पोलिसांना सोशल माध्यमातून मिळाली होती. त्या सगळ्याचा तपास घेतला असता त्या पोस्टचा संबंध बांगलादेशी भागातून असल्याचा समोर आलं आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणाच्या त्या सगळ्या पोस्ट आयपी अॅड्रेस तपासले असता त्या माध्यमातून या बाबींचा शोध लागला. त्यामुळे देशाची अखंडता आणि एकता भंग करण्याचा प्रयत्न असल्यामुळे कलम 152 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फहीन खान याच्यावर गुन्हा, सायबर विभाग सतर्क
या सगळ्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाईंड असल्याचा संशय ज्यावर आहे तो फहीन खान याच्यावर कलम 152 अंतर्गत राज्याविरुद्ध पोलिसांविरुद्ध कट रचनेचा गुन्हा दाखल झालेला आहे. सायबर विभाग तीन दिवसांपासून या सगळ्या प्रकरणात तपास करत असताना त्यांना यामध्ये अनेक माहिती सोशल पोस्ट आणि माध्यमांवर मिळून आले आहे. यामध्ये अनेक ट्विटर हँडलवरन मेसेजेस करण्यात आले होते.त्याचा संबंध बांगलादेशी किंवा राज्याबाहेर असल्याचाही पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने तपास केला जात आहे..
अनेक व्हिडिओ जे भावना भडकवणार होते ते बांगलादेशी संबंधित असल्याचाही माहिती समोर येत आहे. 24 आरोपी ही बाहेरील आहेत, असं सांगण्यात येत आहे. याचा अर्थ असा होतो की, ज्या ठिकाणी हा दंगा झाला त्याभागातील नसून शहरातील इतर भागातले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आल्या त्यामध्ये या बाबी आहेत.
200 जणांची ओळख पटली –
गणेशपेठ कोतवाली आणि तहसील या तिन्ही पोलीस स्टेशन मिळून 1250 संशयित आरोपी विरुद्ध सहा गुन्हे दाखल झाले आहेत. 200 जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. दंगलीनंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला. सीसीटीव्ही फुटेज समाजवादी पोस्ट, अनेक मोबाईलमध्ये शूट झालेले व्हिडिओ या सगळ्यांच्या माध्यमातून ओळख पटवत सुरू केले जात आहे.
वेगवेगळ्या भागातून शंभरच्या वर सीसीटीव्ही फुटेजसाठी डिव्हीआर तपासले. सोशल मीडिया व्हाट्सअप वर कोणी पोस्ट केली यासाठी सायबर विभाग स्वतंत्ररीत्या युद्धपातळीवर काम करत आहे. फोन करून कोणाला आंदोलन स्थळी बोलवण्यात आले भडकवण्यात आले यासाठी सीडीआर तपासल्या जात आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….