पोलिसांवर हल्ला केला त्यांना कबरीतून खोदून काढू, सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “नागपूर हिंसाचारात ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांना कबरीतून खोदून काढू. कुणालाच सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. बाकी इतर गोष्टी क्षम्य आहेत, पण पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही, असे फडणवीस यांनी निक्षून सांगितले.
महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याची टीका विरोधकांनी वारंवार केली. त्यानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. यावेळी फडणवीस यांनी नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोची आकडेवारी सभागृहासमोर मांडतानाच नागपूर हिंसाचारानंतरची सध्याची परिस्थितीही सभागृहाला अवगत केली.
….पण पोलिसांवरील हल्ल्याला माफी नाही
नागपूरचे पोलीस आयुक्त आणि माझ्या माहितीत तफावत असल्याचे विरोधक सांगत आहेत. पण तेच मला ब्रिफिंग करतात. त्यामुळे आमच्या माहितीत अजिबात तफावत नाही. नागपूर हिंसाचारात पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांना कबरीतून खोदून काढू. इतर प्रकरणात माफी मिळेल, पण पोलिसांवरील हल्ल्याला माफी नाही. नागपूर शांत आहे, ते नेहमी शांत असते. गेल्या काही वर्षांत नागपूरमध्ये कधीच दंगल घडली नाही. या समाजाने किंवा त्या समाजाने असे मी म्हणणार नाही. काही लोकांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केले, असे फडणवीस म्हणाले.
औरंगजेबाचे छायाचित्र जाळले, पण त्यावेळी कुरानची आयात नव्हती
औरंगजेबाचे छायाचित्र जाळले, पण त्यावेळी कुरानची आयात नव्हती. तरीही आंदोलनात आयात जाळली असे जाणीवपूर्वक मेसेज व्हायरल केले गेले. नागपूर हिंसाचारात पोलीस कडक कारवाई करीत आहेत. कोणाचीही जात धर्म न पाहता त्यांच्यावर कडक कारवाई केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
नागपूरची सध्याची स्थिती काय?
नागपुरातील हिंसाचार प्रकरणी भालदार पुरा भागातून गुन्हे अन्वेषण विभागाने 6 जणांना ताब्यात घेतले आहे. आधी देखील 50 लोकांना ताब्यात घेतले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने परिसरातील सीसीटीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या घरात शिरून त्यांना ताब्यात घेण्याची प्रतिक्रिया सुरू आहे. नागपूर पोलीस भालदार पुरा परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवित आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….