हिंसाचारानंतर नागपुरात कर्फ्यु; पोलीस म्हणाले,” १०० लोकांच्या जमावाने दगड फेकले अन्…”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांच्या तरुणांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली.
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाले आहेत. त्यानंतर आता नागपुरातील काही भागात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
नागपुरात सोमवारी रात्री झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेनंतर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. त्यानंतर आता भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत नागपूर शहरातील विविध भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी यासंदर्भात आदेश जारी करुन पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहणार असल्याचे म्हटलं आहे.
“नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा संचारबंदी लागू राहील,” अशी माहिती नागपुरचे पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी दिली.
पोलिसांनी काय सांगितले?
“सकाळी ११.३० वा. दरम्यान शिवाजी महाराज पुतळयासमोर विश्वहिंदु परिषद, बजरंग दल, नागपूर तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाल नागपूर येथे विश्वहिंदु परिषद, बजरंग दल, नागपूरचे कार्यकर्ते एकत्रित येवून सदर ठिकाणी २०० ते २५० कार्यकर्ते जमा होउन औरंगजेब की कबर हटाव अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गणेशपेठ पोलीस ठाणे हद्यीत भालदारपुरा येथे संध्याकाळी १९.३० वा. सुमारे विशिष्ट समाजातील ८० ते १०० लोकांनी गैर कायद्याची मंडळी जमवून पोलीसांवर दगडफेक केली व तागावाचे वातावरण निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे जिवीतास धोका निर्माण होवून सार्वजनीक शांततेला बाधा निर्माण झाली,” अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….