‘औरंग्याचे समर्थन करणारे देशद्रोही..’, उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; म्हणाले, ‘महाराष्ट्रचा…’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने पकडले, त्यांचा कृरतेने छळ केला त्या औरंग्याचे समर्थन करणारे देशद्रोहीच आहेत,” असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत केला.
डोंबिवली पूर्वेकडील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिंदे यांनी हा अश्वारूढ पुतळा इतिहासाची साक्ष आहे. युवा पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा देत राहील असेही सांगितले.
नवी ओळख छत्रपती शिवाजी महाराज चौक
डोंबिवली पूर्वेकडील गार्ड सर्कल येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त इंदू राणी जाखड, खासदार श्रीकांत शिंदे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी आधी डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावर गार्डन सर्कल हे नाव होतं मात्र आजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा युवा पिढीसाठी अभिमान जागवणारा पुतळा आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराजांचे हे रूप डोळ्यात साठवून ठेवलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “आज शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होतं आहे. हा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून ओळखला जाईल. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीम चे अभिनंदन करतो. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचे सकाळी लोकार्पण झाले. हा अश्वारूढ पुतळा इतिहासाची साक्ष आहे, युवा पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा देत राहील. प्रत्येक शिवभक्तांनी महाराजांचे हे रूप डोळ्यात साठवून ठेवलं पाहिजे,” असं म्हणत खासदार लेकाच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्मारकाचं कौतुक केलं.
समर्थन करणारे देशद्रोही
“आपल्या देशातल्या काही औलादि आहेत ज्यांना औरंगजेबाचे गोडवे गायला आवडते. ज्यांनी गायले त्याला मी सभागृहात दाखवलं. असा माणूस सभागृहात बसायच्या लायकीचा नाही. त्याच्यावर देशद्रोहाच गुन्हा दाखल करत कारवाई करा अशी मागणी केली. शिवभक्तांच्या, शंभूभक्तांच्या ज्या भावना आहे त्याच भावना एकनाथ शिंदेंच्या आहेत. औरंगजेब महाराष्ट्रचा घास घ्यायला आला होता. औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने कैद केलं. त्यांचा क्रूरतेने छळ केला. इतकी क्रुरता ज्या औरंग्याने दाखवली त्याचे समर्थन करणारे देशद्रोही आहेत.” असा घणाघात शिंदेंनी केला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….