‘औरंगजेबाचे उदात्तीकरण नको’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “‘देशात केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा गायिला जाईल. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. कोणी तसे करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला चिरडून टाकू’, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला.
पन्नास वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षित स्थळ घोषित केल्याने तिच्या रक्षणाची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. आमच्या हजारो लोकांना मारणाऱ्याच्या कबरीचे संरक्षण आम्हाला करावे लागते, हे आमचे दुर्दैव आहे,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर भिवंडीतील (जि.ठाणे) मराडे पाडा येथे उभारण्यात आले आहे. शिवछत्रपतींचे हे राज्यातील पहिले भव्य मंदिर आहे. तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून या मंदिराचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी खासदार सुरेश म्हात्रे, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, महेश चौघुले, श्रीराम मंदिर न्यास समितीचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज आदी उपस्थित होते. शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने हे मंदिर उभारल्याबद्दल राजू चौधरी, कैलास महाराज निचिते यांच्या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
‘मंदिराला पर्यटनस्थळ म्हणून दर्जा देणार’
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मराडे पाडा येथे उभारलेल्या मंदिराला राज्य सरकारकडून पर्यटनस्थळ म्हणून दर्जा दिला जाईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
फडणवीस म्हणाले
शिवरायांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘युनेस्को’कडे प्रस्ताव
छत्रपती संभाजी महाराजांना जेथून कपटाने पकडले तो संगमेश्वर येथील वाडा ताब्यात घेऊन विकास करणार
शिवाजी महाराजांना आग्रा किल्ल्यातील ज्या कोठडीत ठेवले ती राज्य सरकारच्या ताब्यात देण्याची उत्तर प्रदेश सरकारला विनंती

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….