नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ पाडण्यास सुरूवात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नाशिक :- “काठे गल्ली सिग्नललगतच्या रस्त्यावरील अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम शनिवारी सकाळी महानगरपालिकेचे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून सुरू केली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरातील आठ मार्गांवरील वाहतूक पूर्णत बंद करण्यात आली आहे.
तसेच काठेगल्ली सिग्नल व परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांना एकत्रित जमण्यास प्रतिबंध केला आहे. द्वारका, काठे गल्ली, भाभानगरकडून जाणारे मार्ग व सभोवतालच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केल्यामुळे या भागास पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
काठे गल्ली सिग्नलकडून नागजी चौक, मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर हे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेने पोलिसांच्या सहकार्याने पूर्वतयारी करीत नियोजन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठी कुमक तैनात केली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या विरोधात आंदोलनासाठी काठे गल्ली चौकात एकत्रित जमण्याचे संदेश समाजमाध्यमांवरून प्रसारित झाले. तर विशिष्ट गटांनी या आंदोलनास विरोध करण्याचे संदेश प्रसारित केले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी उपरोक्त भागात जमावबंदी केली. काठे गल्ली व अन्य परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांचा जमाव करण्यास मनाई केली. या दिवशी परिसरात कोणत्याही मोर्चास व आंदोलनास परवानगी देण्यात आलेली नाही. भारतीय नागरी सुरक्षा संहितेतील कलमांन्वये नाशिक परिमंडळ एकमधील उपरोक्त भागात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र होण्यास प्रतिबंध करण्यात आला. ज्या भागात ही कारवाई सुरु आहे, तिकडे जाणारे सर्व रस्ते लोखंडी जाळ्या लावून बंद करण्यात आले. कोणालाही या भागात प्रवेश दिला गेला नाही. सभोवतालच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले. मोहीम पूर्ण होईपर्यंत दुकाने व आस्थापना बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे.
आठ मार्गावरील वाहतूक बंद
आठ मार्ग वाहतुकीसाठी सकाळी सहा वाजेपासून बंद करण्यात आले. यात पुणे महामार्गावरील द्वारका चौक-नाशिकरोड रस्ता, मुंबई-आग्रा महामार्गावरील संतोष टी पॉइंटकडून द्वारका चौकाकडे येणारा मार्ग, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडून सेवा रस्ताने मुंबई नाक्याकडे येणारी वाहने, सारडा सर्कलकडून द्वारकाकडे जाणारी आणि मुंबई नाकाकडू द्वारका चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आला. या शिवाय राघोजी भांगरे चौक ते साहिल लॉन्स मार्ग, नागजी चौक ते काठेगल्ली सिग्नल आणि उस्मानिया चौक ते मुरादबाबा दर्गा या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या मार्गांवरून ये-जा करणारी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.
महंतांसह काही कार्यकर्ते ताब्यात
धार्मिक स्थळावर कारवाई सुरू असताना या भागात आलेले महंत सुधीरदास पुजारी आणि १० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काठेगल्ली भागात आम्ही कुठलेही आंदोलन करणार नव्हतो. नोटीस न देता आम्हाला ताब्यात घेतल्याची तक्रार संबंधितांकडून होत आहे. प्रशासनाने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याचे महंत सुधीरदास पुजारी यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….