सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात? कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, नेमकं प्रकरण काय?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी रान उठवलं आहे. अशातच आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुरेश धस यांच्याविरुद्ध निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) महेबुब इब्राहिम शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत सुरेश धस यांच्यावर धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. औरंगाबाद खंडपीठात सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दबाव टाकून मतदान, धसांवर आरोप
सुरेश धस यांनी मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडीओ व्हायरल केले, शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतले, असे आरोप करण्यात आले आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मागणी करूनदेखील फॉर्म ‘१७ सी’ची प्रत त्यांना दिली नाही. निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडीओग्राफी, तसेच सीसीटीव्ही फुटेज यांची मागणी करून देखील त्यांना ते पुरविलं गेलं नाही, असं देखील याचिकेत म्हटलं गेलं आहे.
विजयी उमेदवाराला झुकतं माप?
यावरून निवडणूक अधिकारी विजयी उमेदवाराला झुकतं माप देत होते असं दिसतं, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात आली की काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. औरंगाबाद खंडपीठातील पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे.
सुरेश धस घेणार मस्साजोग ग्रामस्थांची भेट
मंत्री धनंजय मुंडे आणि धस यांच्या भेटीनंतर सुरेश धसांवर टीका झाली. माञ आता सुरेश धस पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले आहेत. आमदार सुरेश धस देशमुख कुटुंब आणि मस्साजोग ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. यासह परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांची परळीत भेट होईल.
धनंजय मुंडेंनाही नोटीस
धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती दडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी नोटीस पाठण्याचे आदेश दिले काही दिवसांपूर्वी दिले होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….