पुसद व महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याकरिता मुदतवाढ द्या ; आमदार इंद्रनील नाईक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात यावे असे पत्र आमदार इंद्रनील नाईक यांनी दादाजी भुसे कृषिमंत्री यांना दिले आहे.

खरीप हंगाम सन 2020 चा पिक विमा भरण्याची मुदत 31 जुलै शेवटची तारीख शासनाने निश्चित केलेली आहे. सध्या राज्यात तसेच यवतमाळ जिल्ह्यात कोरोना आजाराचे संक्रमीत रुग्ण जास्त प्रमाणात आढळत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रशासनाने 31 जुलै 2020 पर्यंत संचारबंदी घोषित केलेली आहे. संचारबंदी लागू असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा भरता येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून शासनाने पिक विमा भरण्याची तारीख वाढवून देण्या बाबतची मागणी आमदार इंद्रनील नाईक यांनी कृषिमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..