पुसद येथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस पालकमंत्री नामदार संजय राठोड, जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड व पराग पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना माजी तालुका प्रमुख विकास जामकर यांच्या नेतृत्वात पुसद तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
शिवसेनेच्या धोरणाप्रमाणे 80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या गोष्टीची जाणीव ठेवून तसेच कोरोना महामारीत सोशल डिस्टंसिंग पाळून जनतेची आरोग्य तपासणी करण्याचे ठरले. थर्मलगणद्वारे शरीरातील तापमानाची तपासणी आणि ऑक्सिमिटरने ऑक्सिजन तपासणी ग्लायको मीटर मशीनद्वारे शुगर तपासणी गावागावात जाऊन करणार आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बेलोरा,रामनगर, पांढुर्णा केदारलिंग येथे तपासणी करण्यात आली व रामनगर बेलोरा येथे तननाशकची गावात फवारणी करण्यात आली सदर कार्यक्रमात माजी पुसद तालुका शिवसेनाप्रमुख विकास जामकर यांच्या समवेत पिंटू मस्के, भुजंग मारकड, पप्पू गडदे, पवन जामकर,नामदेव गडदे ,उमाकांत मस्के, प्रतीक जामकर, बबन गडदे, निलेश चंदनटिळे,तुकाराम राठोड, परमेश्वर चव्हाण, दिनेश चिकोकार, चेतन कुबडे,संतोष टाकरस,बबन ढोणे,देवराव शिंदे, कैलासपांढरे,भागवत घोलप व गावकऱ्यांनी सहभाग घेतला सदर कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्र बेलोरा चे डॉक्टर हूले, गुलाबराव मस्के, राऊत मॅडम यांनी सहकार्य केले. पुसद येथील शिवभोजन केंद्रावर गरजूंना विनामूल्य भोजन देण्यात आले. हा सामाजिक उपक्रमाचा कार्यक्रम विकास जामकर माजी शिवसेना तालुका प्रमुख यांच्या सहकार्याने पार पडला.