पुसद व दिग्रस तालुक्यातील संचारबंदी तीन दिवस वाढवली* ;जिल्हाधिकारी यांचे आदेश ; पुसदच्या तिन्ही आमदारांनी केली होती मागणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडा शंभरी पार करत कोरोना हॉटस्पॉट निर्माण करणाऱ्या पुसद व दिग्रस तालुक्यात संचारबंदी तीन दिवसांनी वाढविण्यात आलेली आहे. संचारबंदी वाढवण्याबाबत पुसद चे विद्यमान आमदार इंद्रनील नाईक विधान परिषदेचे आमदार निलय नाईक वर डॉ. वजाहत मिर्झा यांनी नुकतेच जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांच्याकडे मागणी केली होती. 
पुसद दिग्रस तालुक्यातील कोरोना ची साखळी तोडण्यासाठी तिन्ही लोकप्रतिनिधी आता विविध उपाययोजना करण्यासाठी सरसावल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कोरोना बाधित आकडा १२० पार केला आहे. तर दिग्रस मध्येही कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पुसद व दिग्रस तालुक्यात २८ जुलै पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती .मात्र आता ही संचारबंदी तिन्ही आमदारांनी केलेल्या मागणीला जिल्हाधिकाऱ्याने प्रतिसाद देत तीन दिवसांनी वाढवण्यात आली असून पुसद व दिग्रस तालुक्यात आता संचारबंदी ३१ जुलैपर्यंत लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

सदर संचावर बंदीच्या कालावधीत ज्या विविध आस्थापना व सेवा संदर्भात व्यक्ती व समूह आला मुभा राहील याबाबत सविस्तर निर्देश सदर आदेशांमध्ये निर्गमित केले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….