सामाजिक उपक्रमाद्वारे उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. वाढदिवसाला कोणताही उत्सव, हारतुरे आदींचा वापर न करता त्या ऐवजी सामाजिक व जनहिताचे उपक्रम राबविण्यात यावेत असे आवाहन स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी केले होते. या आवाहनास अनुसरून यवतमाळ जिल्हा शिवसेनेतर्फे सामाजिक अंतर राखून आणि सर्व नियमांचे पालन करून विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. यवतमाळ येथे हेलिपॅड मैदाना जवळील मोकळ्या जागेत वृक्षारोपण तथा अर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकारक औषधाचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हाप्रमुख पराग पिंगळे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार, निवासी उपजिल्हाप्रमुख प्रवीण पांडे, उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, तालुका प्रमुख संजय रंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत 60 वृक्षांची लागवड करण्यात आली, त्यानंतर गरजूंना अर्सेनिक अल्बम औषधाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सचिन राठोड, नगरसेवक निलेश बेलोकार ,गिरीश व्यास, चंद्रकांत उडाखे, राजू कोहरे, राजू राऊत, चेतन शिरसाट, सचिन बारस्कर, गोलू जोमदे, ऋषी इलमे इत्यादी शिवसैनिक हजर होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..