लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय, मृत्यूनंतर वैद्यकीय क्षेत्राला देहदान करणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बॉलिवूडमधील अतिशय देखणा अभिनेता म्हणून आदित्य पंचोली ओळखला जातो. आदित्य हा त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला आहे.
आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. आदित्य पांचोलीने मृत्यूनंतर वैद्यकीय क्षेत्रात पुर्ण शरीर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 13 डिसेंबर रोजी लायन गोल्ड अवॉर्ड्स (Lions Gold Awards 2024) सोहळ्यात वैद्यकीय शास्त्रासाठी आपला देह दान करण्याचा निर्णय जाहीर करणार आहे.
वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय संशोधनात मदत करण्यासाठी हा इतका मोठा निर्णय घेतल्याचं त्यानं म्हटलं आहे. आदित्य पांचोलीने त्याला प्रेरणा कुठून मिळाली हे सांगितले. आदित्य म्हणाला, ‘अभिनेता म्हणून आपण पडद्यावर नायकाची भूमिका करतो पण खरी वीरता ही अशी कामं करण्यात दडलेली असते जेणेकरून आपण समाजाला काहीतरी परत देऊ शकू. शरीर दान करण्याचा माझ्या या निर्णयातून मला आशा आहे की इतरांना यातून प्रेरणा मिळेल. यामुळे मी मृत्यूनंतरही जगासाठी योगदान देत राहू शकेल”. त्याच्या या उदात्त निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आदित्य पांचोलीला १९९०मध्ये महेश भट्ट दिग्दर्शित ‘जख्मी जमीन’ या चित्रपटानेओळख मिळवून दिली. यानंतर आदित्य अनेक चित्रपटांमध्ये झळकला. चित्रपटांमध्ये खलनायक बनून आदित्य पंचोलीने प्रसिद्धी मिळवली. ‘अव्वल नंबर’, ‘जंग’, ‘खिलोना’, ‘येस बॉस’, ‘हमेशा’ आणि ‘ये दिल आशिकाना’मध्ये त्याने साकारलेला ‘व्हिलन’ अधिक गाजला.आदित्य पांचोलीने त्याच्यापेक्षा तब्बल ६ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री झरीना वहाबशी लग्न केलं आहे. मात्र, विवाहित असताना देखील आदित्य पंचोलीचे नाव कंगना राणौतशी जोडले गेले होते.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..