इरफान खानच्या निधनानंतर सुशांतला मिळाली होती ‘ही’ ऑफर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
.मागील दोन महिन्यांमध्ये बॉलीवूडला एका मागोमाग एक मोठे धक्के बसले . इरफान खानच्या निधनानंतर , ऋषी कपूर व त्यानंतर वाजीद खान , बासू चटर्जी व काल अचानक अनपेक्षितरित्या सुशांतची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली.
दिग्दर्शक आनंद गांधी इमर्जेस नावाचा चित्रपट बनविणार आहेत आणि त्या चित्रपटामध्ये त्यांनी इरफान खानला घेतले होते. त्याच्या निधनानंतर त्यांनी सुशांतला घेण्याचे निश्चित केले होते. मात्र आता त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
” शिप ऑफ थिसीस ” चे 2013 ला आनंद गांधी यांनी काम केल्यानंतर त्यांच्या नावाची मोठी चर्चा बॉलीवूडसह विविध देशांमध्ये होती.तुंबाड “च्या लेखन व क्रियेटीव्ह डायरेक्टर म्हणूनही त्यांच्या नावाचा गाजावाजा झाला . त्यांनी त्यांच्या आगामी फिल्मचे नाव ” इमर्जेस ” ठेवले आहे .
आनंद आणि सुशांत हे दीर्घ काळापासून मित्र होते . मात्र सुशांतच्या या अचानक जाण्याने ते कोलमडून गेले आहेत . इरफान व आता सुशांतच्या अकाली जाण्याने मला मानसिक धक्का बसला आहे, असे ते म्हणाले.
जवळपास पाच वर्षे आनंद यांनी या चित्रपटाच्या पटकथेवर काम केले आहे. आनंद यांनी सुशांतला याबद्दल सांगितले होते. याशिवाय अन्य चार अभिनेत्रींची निवड बाकी होती .आपल्या चित्रपटासाठी आनंद यांनी ऑस्ट्रेलियन अभिनेता ह्युगो व्हीविंगला निश्चित केले होते

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..