महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून रेती तस्करी सुरू ; तहसीलदाराची मूकसंमती की हतबलता ?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रितेश पुरोहित ९४२३७०३८३१
महागाव :
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतरही महागाव तालुक्यातील रेती तस्करी आटोक्यात आलेली नाही स्थानिक तहसीलदाराची मूकसंमती की हतबलता ?कळायला मार्ग नाही परंतु तालुक्यातील रेती तस्करी लोकायुक्तांच्या दरबारात पोचलेली असतानाही रेतीची वाहतूक काही केल्या थांबलेली नाही रोज रात्री राजरोसपणे रेतीची तस्करी सुरू असल्याचे अनेक पुरावे प्रशासनाच्या हाती लागत आहेत .
जिल्हाधिकारी यांच्याकडून तहसीलदारांवर ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे रेती तस्करी मधून शासनाला कोट्यावधी रुपये फटका बसलेला आहे. तालुक्यातील सर्व रेतीघाट रिकामे झालेले असताना प्रशासन अद्यापही झोपेचे सोंग घेत आहे रेती तस्करी संपूर्ण राज्यभर गाजत असताना वरिष्ठांकडून महागाव तहसीलदारांना पाठीशी घालण्याचे काम होताना दिसत आहे त्यामुळे रेती तस्करी मधून होणारी लाखोंची उलाढाल नेमकी कोणाच्या फायद्याची ठरत आहे यावर संशय व्यक्त केल्या जात आहे या व्यवसायातून मिळकतीचे पाट यवतमाळ पर्यंत पोहोचले असल्याची माहिती महसूल प्रशासनातील अधिकारी-अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे.
तालुक्यातील रेती घाट लिलाव होण्यापूर्वी पूर्ण रिकामे झालेले आहे त्याचे मोजमाप करण्यासाठी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी जिल्हा खनिकर्म विभागाला पत्र दिलेले आहे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी तालुक्यातील रेती घाटाचे पंचनामे करण्यासाठी पथक पाठवले आहे परंतु तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदारांनी या पथकाची दिशाभूल करून चोरी गेले लेले रेतीघाट दाखवण्याऐवजी भलतेच रेतीघाट दाखवले आहे त्यामुळे स्थानिक प्रशासन चौकशी पथकाला मॅनेज करण्यामध्ये यशस्वी झाल्याचे दिसत आहे याचा फायदा अजूनही रेती तस्करांनी सोडलेला नाही तहसील प्रशासनाला हाताशी धरून रेतीचा अवैध उपसा सुरूच आहे.
रेती तस्करांनी अवैध वाहतुकीचा पॅटर्न बदलला आहे पूर्वी ट्रॅक्टर टिप्पर मधून होणारी वाहतूक दहा मधुन होणारी वाहतूक 10 चाकाच्या ट्रकमधून होऊ लागली आहे असाच एक दहा चाकाचा ट्रक मुडाना महागाव मार्गे पुसद ला जात असताना ट्राफिक शिपायाला मिळून आला आहे सदर शिपायाने त्याची माहिती ठाणेदाराला देऊन सदर ट्रक ठाणेदाराच्या घरासमोर चार दिवस उभा करून ठेवण्यात आला होता अधिकाऱ्यांचा सौदा फसल्यामुळे अखेर रेती तस्करीचा भांडाफोड झाला तहसीलदाराने तब्बल चार दिवस उशिरा ट्रक मालकावर दंड ठोठावला आहे विशेष म्हणजे पॉलिटिक्स स्पेशल बुलेटीन च्या माध्यमातून अवैध रेती तस्करीचा भांडाफोड करण्यात आला होता त्यानंतरच तहसीलदाराने संबंधितावर दंड आकारला आहे.
हे प्रकरण ताजे असताना रविवारी रात्री 11 वाजता फुलसावंगी वरून महागाव मार्गे पुसदला रेतीचा टिप्पर भरून जात असताना नायब तहसीलदार डॉक्टर एस एस अडमुलवार यांनी पकडला आहे. टिप्पर क्रमांक एम एच 34 एबी 8716 हा टिप्पर महागाव तहसील कार्यालयात जप्त करण्यात आला आहे रात्रीची वाहतूक सुरू असताना तहसीलदार मात्र कुठेही पेट्रोलिंग वर जात नाही त्यामुळे धनोडा हिवरा दहिसावळी फुलसावंगी शिरपूर भोसा करंज खेड अन्य ठिकाणावरून आजही राजरोसपणे रेतीची अवैध वाहतूक प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू आहे याला तहसीलदाराची मूकसंमती समजायचे की हतबलता ? हे कळायला मार्ग नाही. अवैध रेती तस्करी मध्ये महसूल प्रशासनाची प्रचंड बदनामी होत असताना वरिष्ठ अधिकारी तहसीलदार आवर कोणतीही कार्यवाही करत नाहीत याचेच नवल जनतेला वाटत आहे.