अरविंद केजरीवाल यांना दिलासा ; ऐन लोकसभा निवडणुकीत न्यायालयाने मंजूर केली अंतरीम जामीन.…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने केजरीवालांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्याचे आदेश देत आहेत.
सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे तर त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे.
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अवघ्या ५ मिनिटांत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांची 4 जून रोजी निकाल जाहीर होईपर्यंत अंतरिम जामीन देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.