पुसद शहरात भिमशक्ती तर्फे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकात महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन भिमशक्ती सामाजिक संघटना पुसद च्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुसद नप चे माजी पाणी पुरवठा सभापती राजु दुधे , बिरसा मुंडा ब्रिगेड चे अध्यक्ष पांडुरंग व्यवाहारे. डॉ. शंकर दळवे , नारायण वडस्कर , प्रदिप पापीनवार, ॲड. विघ्ने , बाबुराव पाईकराव, यादव हाटे, अनील गवळी, सुनिल आहळे , प्रफुल वडस्कर, प्रकाश मडके, एजाज भाई यांची विशेष उपस्थिती होती. सर्व प्रथम कार्यक्रमाचे विशेष अतिथी राजु दुधे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले या वेळी असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल वडस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन यादव हाटे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन भिमशक्ती चे अध्यक्ष संतोष आंभोरे यांनी केले.