उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभा ची उमेदवारी जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सांगली :- “चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो. चंद्रहार दिल्लीत जाणार आहे. मर्द दिला आहे, त्याला जिंकून देण्याचा मर्द पणा दाखवा”, असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
आम्ही भाजपला सोडलं हिंदूत्व सोडलं नाही. दुसऱ्या धर्माचा द्वेष करणे हे छत्रपतींनी शिकवलं नाही. महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल, तर औरंगजेब वृत्तीला मुठमाती दिल्याशिवाय राहणार नाही”, असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. सांगली येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
ईडी, इनकम टॅक्स भाजपचे घरगडी झाले
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ईडी, इनकम टॅक्स भाजपचे घरगडी झाले असले तरी माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. अजित पवारांना पक्षाचं चिन्ह वापरताना खाली सूचना द्यायला सांगण्यात आली आहे. सिगारेटच्या पाकिटावर सावधानतेचा इशारा दिला जातो. तशाच प्रकारे अजित पवारांना न्यायालय निकाल देत नाही तोवर तसेच लिहावे लागणार आहे. भाजपची परिस्थिती कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी झाली आहे.
शिवसेनेनं पेरलेल्या बियांचा आता वटवृक्ष झाला आहे
पुढे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, शिवसेनेनं पेरलेल्या बियांचा आता वटवृक्ष झाला आहे. भाजपच्या बियांना अंकुर देखील फुटला नाही. जो माणूस मातीत खेळतो तो मातीशी बेईमानी करत नाही. काही माणसं ओळखण्यात माझी चूक झाली. काय दिलं नव्हतं म्हणून खाऊन खाऊन पचन झालं नाही म्हणून पळून गेले. शिवसेना नसती तर हे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची ओळख महाराष्ट्राला झाली असती का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
शिवसेनेने किंवा काँग्रेसने कधीही सुडाचे राजकारण केले नाही
आज या मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दम दिला आहे. तुमच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. आता निवडणुकीनंतर कुंडली आणि पोपट घेऊन झाडाखाली बसण्याचे काम आहे. कोल्हापुरात जाऊन शाहू महाराज यांची भेट घेतली. तिथे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. शिवसेनेने किंवा काँग्रेसने कधीही सुडाचे राजकारण केले नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकांवर टीका करायचे पण सुडाने वागले नाहीत, असंही ठाकरेंनी नमूद केलं.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..