कोकणात गणपतीला जाणाऱ्यांसाठी टोलमाफी, सरकारचा मोठा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कोकणात गणपतीला जाणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारने टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही टोलमाफी १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान असणार आहे.
सरकारने याबाबत एक परिपत्रक ही प्रसिद्ध केलं आहे. या परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, आगामी सन २०२३ च्या आगामी गणेशोस्तव कालावधीत “कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोस्तवानिमित्त पथकर (Toll) माफी व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचना व निर्देश दिलेत.
या पत्रकात पुढे लिहिलं आहे की, ”२०२३ च्या गणेशोस्तवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांना / वाहनांना पथकरातून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने १६.०९.२०२३ ते १.१०.२०२३ या कालावधीत मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-४८), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (राम -६६) वरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोस्तव भाविकांना / वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना सवलत देण्यात येत आहे.
गणेशभक्तांना गाडीवर लावावं लागेल ‘गणेशोस्तव २०२३, कोकण दर्शन’ स्टीकर्स
टोलमाफी मिळवण्यासाठी गणेशभक्ताना आपल्या गाडीवर ‘गणेशोस्तव २०२३, कोकण दर्शन’ हे स्टिकर लावावं लागणार आहे.
पत्रकात म्हटलं आहे की, याकरिता सोबत जोडल्याप्रमाणे “गणेशोस्तव २०२३, कोकण दर्शन* अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक. चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन ते स्टीकर्स (पासेसचा नमुना सोबतचे जोडपत्र अ प्रमाणे) आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस / पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर. टी. ओ. ऑफिसेस मध्ये उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच सदरचे पास परतीच्या प्रवासाकरीता ग्राह्य धरण्यात येतील.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..