लोकसभेत बोलताना राहुल गांधींवर कॅमेरा का नव्हता..? स्वतःच सांगितलं कारण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशातील विरोधकांच्या आघाडीने मोदी सरकारविरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी विरोधकांच्या आघाडीने हा प्रस्ताव आणला होता.
त्यानंतर राहुल गांधी यांनाही आपली खासदारकी परत मिळाली आणि त्यांनी सरकारला या प्रश्नावरून धारेवर धरले होते. दरम्यान, अविश्वास प्रस्तावार लोकसभेत त्यांचे भाषण सुरू असताना बराच वेळ त्यांच्यावर कॅमेरा का नव्हता या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
राहुल गांधी यांनी बुधवारी अविश्वासाच्या प्रस्तावावरून सरकारला धारेवर धरणारे भाषण केले. जवळपास ३७ मिनिटांच्या भाषणामध्ये राहुल गांंधी यांना टीव्हीवर फक्त १४ मिनीटे दाखवण्यात आले. तर इतर वेळेत लोकसभा अध्यक्षांंना टीव्हीवर दाखवण्यात आलं असा आरोप काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी केला आहे. यावरून राहुल गांधी यांनी अखेर मौन सोडलं असून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
“कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझा चेहरा बघण्याची इच्छा नसेल. पण तरीही ते लोकसभेत माझ्या व्हिडिओच्या संदर्भात बोलतात. नेमकं काय आहे माहिती नाही पण ते माझा चेहरा टीव्हीवर बघू इच्छित नाहीत असं मला वाटतंय” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर ताशेरे ओढले आहेत.
मणिपूर मुद्द्यावर काय बोलले पंतप्रधान मोदी?
“मणिपूरच्या विकासासाठी आम्ही सक्षम आहोत. मणिपूरमध्ये अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत, त्या कुटुंबासोबत आम्ही आहोत. काँग्रेसमुळे नॉर्थ इस्ट भागाचा विकास होऊ शकला नाही, पंडीत नेहरू याला कारणीभूत आहेत” असं मोदी सभागृहात म्हणाले आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….