पंतप्रधान मणिपूरला का जात नाहीत, मला माहित आहे, पण…; राहुल गांधींचं मोठं विधान…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत गुरुवारी रेकॉर्डब्रेक भाषण केलं. यावेळी मोदींनी दोन तासाहून अधिक वेळ भाषण केलं. मात्र पहिल्या दीड तासांत मोदींनी मणिपूरचा नामोल्लेखही केला नव्हता.
त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर मोदींनी विरोधकांचा समाचार घेत आक्रमक टीका केली. मोदींच्या आक्रमक भाषणाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी लोकसभेत हासून बोलत होते. मणिपूर जळत असताना मोदी लाजिरवाण्या पद्धतीने बोलत होते. हे अत्यंत वाईट होतं. भाजपला मणिपूर शांत करायचं नाही.फोडा आणि राज्य करा, हेच मोदींचं धोरण आहे. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाल्याचं राहुल गांधी म्हणाले.
पुढं राहुल गांधी म्हणाले की, मणिपूर मागील चार महिन्यांपासून जळत आहे. ते लोकसभेत बसून हसत आहेत. हे थांबायला हवं. भारत जळतोय, यावर काही तरी करायला हवं. तसेच मोदी मणिपूरला का जात नाही, हे मला ठावूक आहे. पण मी ते सांगू शकत नाही,असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….