दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधकांचा सभात्याग…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिल्ली सेवा विधेयक गुरुवारी लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे. मतदानादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. दरम्यान, सभापती ओम बिर्ला बोलत असताना आपचे खासदार सुशील कुमार रिंकू यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांवर कागद फाडून फेकला.
त्यामुळे सुशील कुमार रिंकू यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. सुशील कुमार रिंकू हे आम आदमी पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार आहेत.
दिल्ली सेवा विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. दिल्ली सेवा विधेयक मंजूर करण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केले. यावेळी अमित शाह यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवर जोरदार निशाणा साधला. आतापर्यंत हे लोक चर्चेसाठी सांगत होते की, पंतप्रधान आल्यावर चर्चा होईल, पण आज काय झाले? आज पंतप्रधान आले नाहीत, मग त्यांनी चर्चेत का भाग घेतला? जोपर्यंत तुम्हाला चर्चा करायची आहे, तोपर्यंत आम्ही मणिपूरवर चर्चा करण्यास तयार आहोत, मी उत्तर देईन, असे अमित शाह म्हणाले.
दरम्यान, संसदेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आता लागू होणारा कायदा दिल्ली सेवा अध्यादेशाची जागा घेईल, ज्यात दिल्लीत वरिष्ठ नोकरशहांच्या पोस्टिंग आणि बदलीसाठी प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे. सरकार ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (सुधारणा) विधेयकानुसार, बदली आणि पोस्टिंग दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीद्वारे केली जाईल. त्यात मुख्य सचिव आणि प्रधान गृह सचिव सदस्य म्हणून असतील. लेफ्टनंट गव्हर्नर समितीच्या सल्ल्याने बदल्या आणि नियुक्त्या करतील. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने या अध्यादेशाला कडाडून विरोध केला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षही या अध्यादेशाच्या विरोधात आहेत.

महाराष्ट्र एकवटणार..! राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलली; दोन ऐवजी एकच मोर्चा, शिवसेनेला चर्चेसाठी प्रस्ताव….
इंदिरा गांधींजी असत्या तर त्यांनी पाकिस्तानचे 4 तुकडे केले असते, नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या….
पुसदच्या मुस्लिम बांधवांनी लाईट बंद करून ‘वक्फ कायदा 2025’ चा शांततेच्या मार्गाने केला विरोध ; संपुर्ण पुसद शहरातील मुस्लिम समाजाचा लाईट बंद आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग….
महागाव येथे सत्यपाल महाराज यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ; महागाव तालुका पत्रकार संघाच्यावतीने विविध मान्यवरांचा पुरस्काराने केला जाणार सन्मान….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….
नितेश राणेंना त्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल..!
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला ‘त्या’ चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण…..
विधान परिषदेसाठी मविआघडीचा उमेदवार ठरला..? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब….