विधान परिषदेसाठी मविआघडीचा उमेदवार ठरला..? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. महाविकास आघाडी मविआकडून उद्धव ठाकरे हेच उमेदवार असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ते गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
याआधी उद्धव ठाकरे हे निवडणूक लढवण्यास फारसे इच्छुक नव्हते. पक्षातील इतर नेत्यांना संधी द्यावी, अशी त्यांची भूमिका होती. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी अखेर होकार दिल्याचे समजते.
विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान १२ मे रोजी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. शेवटच्या दिवशीच ठाकरे अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीकडे मर्यादित संख्याबळ असल्याने केवळ एकच उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शरद पवार यांनीही यापूर्वी ठाकरे यांनी विधान परिषदेत जावे, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे मविआतील तिढा सुटल्याचे मानले जात आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला आहे. “ठाकरे जाणार हे आधीपासूनच ठरलेलं होतं, अनावश्यक चर्चा निर्माण करण्यात आली,” असे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे विधान परिषद निवडणुकीत आता नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.

नितेश राणेंना त्या प्रकरणात थेट तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल..!
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला ‘त्या’ चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण…..
‘खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट….
ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मोठी खेळी..? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा….
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा…
रंगराव काळे यांना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित ; शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल….
विधान परिषदेसाठी मविआघडीचा उमेदवार ठरला..? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब….