हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के ; तीन तालुक्यात जाणवले धक्के
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :
हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यामध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले.त्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हिंगोली जिल्ह्यातील जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी या तीन तालुक्यातील गावात आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. भूकंपाच्या धक्क्यांच्या घटनेमुळं जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्ह्यात 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिली आहे. या भूकंपात कोणतीही जीवीतहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हिंगोलीच्या वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यांमध्ये यापूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. पुन्हा आज सकाळी 4 वाजून 30 मिनिटाला 3.6 रिश्टर स्केल असा भूकंपाचा धक्का बसलेला आहे. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली. परंतु, या प्रकारानंतर वसमत, कळमनुरी, औंढा या तिन्ही तालुक्यातील 17 ते 18 गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. औंढा तालुक्यातील दुधाळा, जलालधाबा, राजापूर या गावात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यात कोणतेही नुकसान झाले नसून प्रशासनाकडून घाबरून न जाण्याचं आव्हान करण्यात आलं आहे.

Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’