अजित पवार यांच्या सुरक्षेमध्ये अचानक मोठी वाढ ; पोलीस बंदोबस्त वाढवला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बारामती :- विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांचा विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार असतो. मात्र आज अचानक अजित पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
अजित पवार हे विद्या प्रतिष्ठानमध्ये आहेत. या इमारतीच्या गेटच्या आत कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जात नाहीये. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये अचानक पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे.
मात्र अजित पवार यांच्या सुरक्षेमध्ये अचानक का वाढ करण्यात आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अजित पवार हे आठवड्यातून एकदा बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान येथे आपला जनता दरबार भरवतात. जनता दरबाराचे आयोजन अजित पवार यांच्या सुरक्षेमध्ये अचानक वाढ करण्यात आली आहे. अजित पवार दर आठवड्याला बारामतीमध्ये आपला जनता दरबार भरवतात.
बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान येथे हा जनता दरबार भरतो. मात्र आज अजित पवार हे जनता दरबारसाठी विद्या प्रतिष्ठान येथे आले असता आज अचानक त्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. मात्र हा पोलीस बंदोबस्त का वाढवण्यात आला या मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
अजित पवारांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी अजित पवार हे दर आठवड्यातून एकदा बारामतीमध्ये जनता दरबार भरवतात. त्यांना भेटण्यासाठी आपल्या समस्या सांगण्यासाठी नागरिक इथे गर्दी करत असतात. अजित पवार नागरिकांच्या समस्या ऐकून घेतात. मात्र आज अचानक त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून, कुठल्याही नागरिकांना आत प्रवेश दिला जात नसल्यानं गेटबाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….