शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला…? ‘या’ नेत्याने सांगितली तारीख…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिंदे-फडणवीस सरकारला काही दिवसात सहा महिने पूर्ण होत आहेत. या सहा महिन्यामध्ये एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होणार असल्याचे वारंवार सांगितले जाते.
त्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळावं म्हणून अनेक प्रयत्न होत आहेत. पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही झाला नाही. पण यावेळी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही ठरली आहे.
याबाबतची माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. तर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगतानाच त्यांनी विस्ताराची तारीख देखील सांगितली आहे. संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगितली आहे.
येत्या 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 15 जानेवारीपर्यंत तांत्रिक अडचणी दूर होतील. त्यानंतर 20 ते 22 तारखेदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असं संजय शिरसाट यांनी म्हटंलं आहे.
बोलताना त्यांनी ठाकरे गटावरही टीका केली आहे. येत्या 8 ते 10 दिवसात ठाकरे गट रिकामा होणार आहे. ठाकरे गटाचे उरलेले आमदार 8 ते 10 दिवसात शिंदे गटात सामील होणार आहेत, असा दावाही शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेत जो सकाळचा भोंगा सुरू आहे त्यामुळे शिवसेना रिकामी होणार आहे. भविष्यात निवडणुका लढवयाच्या की नाही असा प्रश्न उध्दव ठाकरे समोर उभा राहील, असंही संजय शिरसाट यांनी म्हटंलं आहे.

रंगराव काळे यांना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित ; शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल….
Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”