लोकसभा-राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब ; आठवडाभर आधीच गुंडाळ्याची चर्चा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संसदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहेत. निश्चित कालावधीपेक्षा सहा दिवस आधीच अधिवेशन गुंडाळण्यात आल्याची यामुळं चर्चा होत आहे.
७ डिसेंबर ते २९ डिसेंबर या १७ कामकाजांच्या दिवसांत यंदा अधिवेशन पार पडणार होतं.

लोकसभा आणि राज्यसभेच्या बिझनेस अॅडव्हाझरी काऊन्सिल (BAC) कामकाज सल्लागार परिषदेच्या बैठकीत अचानकपणे हिवाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अरुणाचलप्रदेशात भारत-चीन सीमेवर अर्थात एलएसीवर दोन्हीकडील सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून चर्चेसाठी विरोधीपक्षांकडून वारंवार सभागृहात गोंधळ घालण्यात येत आहे. त्यामुळं गुरुवारी लोकसभेच कामकाज पाच वेळा स्थगित करावं लागलं होतं. यापार्श्वभूमीवर कामकाजात वारंवार व्यत्यय येत असल्यानं अनिश्चित काळासाठी ते थांबवण्यात आलं आहे.
तर दुसरीकडं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासाठी राज्यसभेचं हे पहिलचं पूर्णवेळाचं अधिवेशन ठरलं. सभागृहाचं कामकाज थांबवताना त्यांनी आगामी ख्रिसमस, पोंगल, लोहरी आणि इतर सणांच्या सदस्यांना सदिच्छा दिल्या. तसेच वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांबद्दल सतर्क राहण्याचं आवाहनही केलं.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….