अरे बापरे…! महा मोर्चातल्या महिलांनाच माहिती नाही, त्या कशासाठी आल्यात ; पत्रकारांनी “त्या” महिलां सोबत संवाद साधला तर म्हणाले “राजू भैय्या ने हमको लेकर आया है”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईत आज मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरण तापणार आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्च्याला थोड्याच वेळता सुरुवात होणार आहे.
तर भाजपादेखील या मोर्चाला प्रत्यूत्तर म्हणून मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांत माफी मांगो आंदोलन करणार आहे. अशातच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोर्चाला महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत आहे.
या महिलांशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी या महिलांनी आपल्याला मोर्चा कसला आहे ते माहिती नाही असे सांगितले. तसेच आम्हाला तुम्हाला आमच्यासोबत यायचे आहे, असे सांगितले गेले. राजूभाई आम्हाला इथे घेऊन आला आहे, असे या महिलांनी सांगितले. या महिलांच्या हाती मोर्चाचे बॅनर होते, त्यावर विचारले असता काहीनी आपण अंगठछाप असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडीचा शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करणारा हल्लाबोल मोर्चा एकीकडे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपकडून माफी मांगो आंदोलन केले जाणार आहे. हल्लाबोल मोर्चातून महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करणार आहे. महापुरुषांचा अवमान, सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांसाठी हा मोर्चा निघणार असून पोलिसांनी काही अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मुंबईभर ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे.
या आंदोलनात जागोजागी ‘उद्धव ठाकरे माफी मागा, नाना पटोले माफी मागा, अजित पवार माफी मागा,’ असे फलक झळकावण्यात येणार आहेत. तसेच काळे झेंडे दाखवत महाविकास आघाडीचा निषेध करण्यात येईल, असे शेलार यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….