महामानवाबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा ; पुसद येथील माळी समाजाची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे मागणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसा अगोदर थोर समाज सुधारक महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्या बद्दल त्यांनी शाळा चालविण्यासाठी लोकांकडे भीक मागितली असे महामानवांना अपमानित करणारे वादग्रस्त विधान केले,

या गंभीर घटनेच्या निषेधार्थ पुसद येथील माळी समाजाच्या वतीने सौ आशा मडके यांच्या नेतृत्वात असंख्य समाज बांधवांच्या वतीने पुसद विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांना निवेदन देऊन निवेदनाद्वारे महामानवाचा अपमान करणारे राज्याचे मंत्रिमंडळातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सामाजिक भावना दुखावल्यामुळे त्यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे, या निवेदनावर सौ.रंजना दळवे, पुष्पा गिराम,लता सावळे, शीला दळवे, रेखा मडके,पूनम सावळे,विठ्ठल घाटे, यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, विठ्ठलराव खडसे, संतोष अंभोरे शहर अध्यक्ष भीमशक्ती संघटना पुसद, डॉक्टर शंकर दळवे, तुकाराम हाटे, बाबुराव, पाईकराव, प्रकाश मडके, यांच्यासह असंख्य नागरिकांच्या सह्या आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..