धनंजय मुंडेचा पुन्हा एकदा पंकजा मुंडेना धक्का, होमग्राऊंडवरच दिला धोबीपछाड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडेयांना धक्का दिला आहे.
गोपीनाथ गड येथे असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे. 11 सदस्यांपैकी 10 सदस्य आणि सरपंचाची बिनविरोध निवड झाली आहे. धनंजय मुंडे यांनी बिनविरोध ग्रामपंचायत काढत पांगरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लावला आहे. सुशील वाल्मीक कराड हे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मृतीस्थळ गोपीनाथ गड पांगरी ग्रामपंचायत अंतर्गत येतं, त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धोबीपछाड दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीआधीच गुलाल लागल्यामुळे परळीमधील 80 ग्रामपंचायत निवडणुकीत धनंजय मुंडे वरचढ ठरण्याची शक्यता आहे. गोपीनाथ मुंडे यांनी याआधी 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. या निवडणुकीत पंकजा मुंडेंसारख्या तगड्या उमेदवाराचा पराभव करत धनंजय मुंडे जाएंट किलर ठरले होते. आता ग्रामपंचायत निवडणुकीतही धनंजय मुंडे यांनी त्यांच्याच बहिणीला आणखी एक धक्का दिला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..