“कोश्यारी हटाओ” चा नारा…! कारवाईसाठी संभाजीराजे आक्रमक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या विधानानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शनिवारी देखील असा काहीसा प्रकार घडल्याने त्यांच्यावर पुन्हा टीका होत आहे.
२६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना कोश्यारी यांनी चप्पल घालूनच श्रद्धांजली वाहिली. हा प्रकार समोर आल्याने ते पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.
कोश्यारी यांची वक्तव्ये आणि त्यांची कृती ही महाराष्ट्राविरोधी आहे. तरी देखील सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही असा आरोप करत संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून ‘कोश्यारी हटाओ’चा नारा दिला आहे. त्यांच्या या ट्विटने पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारींचा मुद्दा चर्चेत आला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अजूनही भगतसिंग कोश्यारी यांच्यावर कारवाई होत नाही हे राज्यकर्त्यांचे अपयश आहे. आम्ही याचा अर्थ असा समजायचा का, की राज्यकर्ते देखील राज्यपालांच्या विधानांशी सहमत आहेत. महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला कोणीही गृहित धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच! असे म्हणत त्यांनी राज्यकर्त्यांना धमकी वजा समज दिल्याची चर्चा आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….