गांधी कुटुंबीय अखेर मैदानात..! गुजरात निवडणुकीसाठी आखली रणनीती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसने आपले संपूर्ण लक्ष मिशन गुजरातवर केंद्रित केले आहे. या अंतर्गत, पक्ष येत्या 15 दिवसांत एकूण 25 मेगा रॅली काढणार असून त्यामध्ये 125 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या या रॅली आक्रमक निवडणूक रणनीती अंतर्गत असतील, ज्यामध्ये पक्षाचे सर्व बडे नेते सहभागी होतील.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे देखील गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार आहेत. सध्या राहुल गांधी भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेसाठी महाराष्ट्रात आहेत. हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले नसून ते गुजरातमध्ये येणार असल्याची चर्चा आहे.
या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल हे दोन मुख्यमंत्री; काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याशिवाय पक्षाचे माजी मुख्यमंत्री आणि OBC-SC-ST-अल्पसंख्याक वर्गातील मोठे नेतेही येत्या काही दिवसांत गुजरातमध्ये रॅली आणि प्रचार करणार आहेत. यावेळीही काँग्रेसने आक्रमक निवडणूक प्रचाराची रणनीती आखल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
2017 च्या विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधींनी राज्यात आक्रमक निवडणुक प्रचाराचे नेतृत्व केले होते. या मुळं काँग्रेसने गेल्या तीन दशकांतील सर्वोत्तम कामगिरी केली होती त्यामुळं काँग्रेसला 99 जागा मिळाल्या होत्या.
यावेळी काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीत बूथ व्यवस्थापनावर अधिक अवलंबून राहून आपली रणनीती बदलली आहे. राहुल गांधी यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये द्वारका येथील राज्यस्तरीय चिंतन शिबिर येथे पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली, त्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने ‘मूक प्रचार’ योजना राबवली.
शिवाय, काँग्रेसने यावेळी मोठ्या प्रमाणात घरोघरी प्रचारावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत (1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर) होणार आहेत. निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. भाजप आणि काँग्रेससोबत आम आदमी पक्षाच्या प्रवेशामुळे गुजरातमधील निवडणूक यावेळी तिरंगी झाली आहे.

राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….