उद्याच्या सत्तासंघर्ष वरील सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया , म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे आणि शिंदे गटात शिवसेना कोणाची यावरून संघर्ष सुरू आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एका शिंदे गटातील आमदारांवर कडाडून टीका केली आहे.
गद्दारांना धडा शिकवण्यासाठी निवडणुका घ्या असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र येत आहेत. आज तुम्हीही घेऊन आला आहात. मी याला आपल्या विजयाचा पहिला टप्पा मानतो. यानिमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, की उद्या न्यायालयात जे व्हायचं ते होऊ दे, मला न्याय देवतेवर विश्वास आहे. तसेच जनतेच्या भावना आपल्या बरोबर आहेत. जनता फक्त निवडणुकीची वाट बघत आहे. मात्र, निवडणुकीला सामोरे जाण्याची गद्दारांची हिंमत नाही. गद्दारांना जनताच धडा शिकवेल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, कोर्टात उद्या व्हायचं ते होईल, मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. लोकांच्या भावना आपल्यासोबत आहेत. लोक निवडणूकीची वाट पाहात आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, सध्या खोक्यांची चर्चा सुरू आहे. तुम्हीदेखील पाच खोके आणले आहे. मात्र, पाच खोके नॉट ओके. त्यांचे खोके वेगळे आहेत आणि आपल्या खोक्यात निष्ठा असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.
दरम्यान उद्या शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश व्ही. एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील सुनावणी होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात कोण विजयी होईल याकडे सगळअयाचं लक्ष लागले आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….