राणा दाम्पत्य लवकरच भाजपमध्ये…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती, 21 ऑगस्ट :- अमरावतीचा पुढचा खासदार हा भाजपचा असेल, तर बडनेराचा आमदारही भाजपचाच राहील अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (Ravi Rana) हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अमरावतीमधल्या राणा दाम्पत्यांच्या दहीहंडी कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे. खासदार नवनीत राणा या 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अमरावतीमधून निवडून आल्या, तर त्यांचे पती रवी राणा हेदेखील बडनेरा मतदारसंघातून विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले. निवडणुकीनंतर मात्र त्यांनी भाजपसाठी अनुकूल अशी भूमिका घेतली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचणार असल्याचं आव्हान राणा दाम्पत्याने केलं, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या वादानंतर दोघांवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. अडसुळांची अडचण अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार भाजपचाच असेल, अशी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्यामुळे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांची अडचण होऊ शकते. 2019 लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनीच शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.
महाराष्ट्रामध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा आनंदराव अडसुळांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी अडसुळांची नेतेपदी निवड केली. आता राणा दाम्पत्याने भाजपमध्ये प्रवेश केला तर एकनाथ शिंदे आणि आनंदराव अडसूळ ही जागा भाजपसाठी सोडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राणांचं शक्तीप्रदर्शन राणा दाम्पत्याने अमरावतीमध्ये दहीहंडीचं आयोजन करून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. राणा दाम्पत्याच्या या दहीहंडी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला करण्यात आली. मंचावर सिने अभिनेता गोविंदा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा, अनिल बोंडे, रामदास तडस उपस्थित होते. बच्चू कडूंना टोला दरम्यान या कार्यक्रमातून रवी राणा यांनी बच्चू कडू यांना टोला लगावला. मंत्रिपद मिळावं म्हणून दबाव आणणार नाही किंवा गुवाहाटीला जाणार नाही. मंत्रिपद मिळो अथवा न मिळो मी कायम देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिपाई बनून राहीन, असं रवी राणा म्हणाले.

Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’