सोनिया गांधीची चौकशी संपली ; तब्बल तीन तासांनंतर ईडी कार्यालयातून बाहेर.…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या बुधवारी तिसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाल्या.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी ईडीसमोर हजर होण्याची ही तिसरी वेळ आहे. सोनिया गांधी यांची आज ईडीने तीन तास चौकशी केली. त्यानंतर ईडीने (ED) त्यांना पुन्हा नव्याने समन्स जारी केले नाही. सोनिया गांधी यांची गेल्या तीन दिवसांत ११ तास ईडीने चौकशी केली आहे.
७५ वर्षीय सोनिया गांधी यांची ईडीने मंगळवारी सहा तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना आज पुन्हा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. याआधी २१ जुलै रोजी सोनिया गांधी यांची ईडीने दोन तास चौकशी केली होती. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने ही चौकशी केली.
ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिडच्या नियमाचे पालन करून सोनिया गांधी यांची चौकशी ही ऑडिओ-व्हिडीओ स्वरुपात रेकॉर्ड करण्यात आली आहे. दुसरीकडे सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावल्याने काल काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. काल दिल्लीत राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी आंदोलन केले.
काल आंदोलनावेळी राहुल गांधी यांनी केंद्रींय तपास यंत्रणांना लक्ष केलं. तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच राहुल गांधींनी महागाई, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. काल जवळपास अर्धा तास राहुल गांधी आंदोलन करत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतलेल्या इतर नेत्यांसोबत बसमधून नेलं.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….