केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- ”महागाई व बेरोजगारी हे देशापुढील महत्त्वाचे व गंभीर प्रश्न आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून राज्यातील सत्ता अस्थिर करण्यासाठी केंद्रातील सत्तेचा वापर केला जात आहे.
हिंदू-मुस्लिम भेद निर्माण करून इतिहासाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप करतानाच अशावेळी सर्वांनी एकजुटीने सामना करण्याची गरज असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावती विभागीय संवाद मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री एकनाथ खडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ”देशाची सत्ता त्यांच्या हाती असल्याने ते राज्यातील सत्ता अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहीही करून राष्ट्रवादी व शिवसेनेला कसा अधिक त्रास देता येईल, असे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संघटित शक्ती उभी करणे आवश्यक आहे.”
पवार यांनी राज्यातील राजकारणावर अंगुलिनिर्देश करीत सद्यःस्थिती मांडली. ते म्हणाले, ”राजकारणात नैसर्गिक व मानवनिर्मित, असे दोन प्रकारची संकटे असतात. सध्या राज्यात मानवनिर्मित राजकीय संकटे येत आहेत. काश्मीर फाइल्स सारख्या चित्रपटाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे. त्यावेळी तेथे सत्ता कुणाची होती, तिला पाठिंबा कुणाचा होता हे लपवून देशाच्या इतिहासाला सुरुंग लावण्याचे काम सुरू आहे.”
एसटी कामगारांच्या संप व त्यानंतर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करीत ते म्हणाले, ”नेतृत्व चुकीच्या हाती होते. त्यामुळे त्याचे पुढे काय झाले हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही.”
शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर नुकताचा एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी ही टिप्पणी केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..