गुणरत्न सदावर्ते यांच्या जामिनावर आज निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असून त्यांना आज पुन्हा मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टापुढे हजर केले जाणार आहे. त्यामुळे त्यांना कोठडी वाढवून मिळणार की जामीन होणार याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान गुणरत्न सदावर्तेंच्या घरी काल मुंबई पोलिसांचे पथक दाखल झाले होते. त्यांच्या घराची झडती घेतली असल्याची माहिती आहे. या ठिकाणचे यावेळी सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात येत असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आले होते, याची माहिती घेतल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना भेटायला यापैकी कोणी एसटी कर्मचारी आला होता का किंवा इतर स्वरुपाची माहिती आणि पुरावे गोळा करण्याचे काम मुंबई पोलीस करत आहेत. आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची दोन दिवसांची पोलीस कस्टडी संपणार असल्यामुळे त्यांच्याविरोधात एखादा सबळ पुरावा शोधण्याचं काम मुंबई पोलीस करत आहेत.
शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने आंदोलन केले होते. पवारांच्या घराच्या परिसरात आंदोलक आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश शिरले आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. निवासस्थानाच्या आवारात घुसून काही आंदोलकांनी चप्पल फेक केली असल्याचे समोर आले. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून त्याचा तपास सुरू केला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..