शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट ; चर्चांना उधान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि सरकारमध्ये कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे नेहमीच राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतात.
अशातच आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
एकीकडे राज्यातील वातावरण गरम असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनं सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे.
शरद पवार आणि मोदींमध्ये संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
पवारांनी अचानक मोदींची भेट घेतल्याने या भेटीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे आता या भेटीत काय झालं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..