दरेकरांची आमदारकी रद्द करा ; फडणवीसांनीही राजीनामा द्यावा :- भाई जगताप आक्रमक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- प्रवीण दरेकर यांनी 2013 ते 2020 या कार्यकाळात 2 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. सहकार विभागाच्या चौकशीत हे बाहेर आले आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांची आमदारकी रद्द करून त्यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.
प्रवीण दरेकर यांनी 2013 ते 2020 या कार्यकाळात मुंबै बँकेत 2 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. सहकार विभागाच्या चौकशीत हे बाहेर आले आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांची आमदारकी रद्द करून त्यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्या –
मुंबई बँकेत (Mumbai Bank Scam) ते मजूर म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल करतात, तर विधानभवनात आमदार बनताना. बिझनेसमन म्हणून त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यावेळचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दरेकर यांना पाठीशी घातले. या घटनेची जबाबदारी घेऊन नैतिकता असेल तर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही भाई जगताप यांनी केली आहे.
शिवजयंती दोनवेळा नको –
शिवजयंती दोनवेळा नको. सरकारी नियमानुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती केली जाते. मात्र, ज्यांना तिथीनुसार जयंती करायची आहे त्यांना घरात किंवा संस्थेत करू द्या, तिथीच्या दिवशी जगजाहीर जयंती नको. माझ्या मागणीबाबत चुकीच्या अर्थाच्या बातम्या चालवण्यात आल्या असल्याचे भाई जगताप म्हणाले.

राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….