नवाब मलिक बिन खात्याचे मंत्री राहणार ; पालक मंत्री पदाची ही जवाबदारी दुसऱ्याकडे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्याबाबत आता एक मोठा निर्णय समोर आला आहे. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची सिल्वर ओकवरील बैठक संपली आहे.
ही बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यात नवाब मलिकांच्या राजीनामा घेवू नये अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार राखी जाधव यांच्याकडे देण्यात येणार आहे.तसेच नवाब मलिक यांच्याकडे जी पालकमंत्रीपद आहेत तीही काढून घेण्यात येणार आहे. नवाब मलिक सध्या गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री आहेत. त्यांचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे दिला जाणार आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचा कार्यभार दिला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..